अक्षत व्हीसीओ हे नारळापासून तयार केलेले १०० टक्के शुद्ध तेल सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या ताज्या दुधामधून काढले जाते. रसायने आणि उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील पोषणतत्त्वे तेलात जशीच्या तशी उतरतात आणि निर्यातक्षम दर्जाचे व्हीसीओ मिळते.
त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक अॅसिड एरव्ही केवळ मातेच्या स्तन्यात आढळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात लक्षणीय ठरते. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय पातळीवर "Mother of All Oils" म्हणून गौरवप्राप्त आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या केटोन्स स्मृती वाढविण्यास मदत करतात, तर पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते. अत्यंत तरल आणि त्वचेतून सहजपणे झिरपणारे हे तेल निसर्गातील सर्वोत्तम औषधी तेल म्हणून गणले जाते.
वृ्द्धापकाळात कमी होत जाणारी आंतरिक शक्ती आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या तेलाचा खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे विस्मृती, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.
तणावपूर्ण जीवनशैली असणाऱ्या (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हीसीओचे दररोज सेवन केल्यास खूप फायदा होतो.
तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हीसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरिक अॅसिड मुलांची सुदृढ प्रकृती घडवण्यास मदत करते.
व्हीसीओने मसाज केल्यास सांधेदुखीवर त्वरित आराम मिळतो.
व्हीसीओने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.
'अक्षत व्हीसीओ' तोंडावाटे प्राशन करण्यासाठी बनवले असून, रोज २ ते ३ चमचे घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात! अर्थातच, आयुर्वेदतज्ज्ञाच्या सल्ल्याने आपल्या प्रकृतीनुसार व्हीसीओचे प्रमाण आणि प्राशन करण्याची वेळ ठरवून घेतल्यास अधिक परिणामकारक ठरते.
Akshat VCO is a 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. No chemicals or external heat is used thus all the nutrition & goodness in coconut milk is obtained in the oil as it is.
A Product by - Ashadhi Ventures Pvt. Ltd.